70 ते 90 च्या दशकातील कोणताही चित्रपट असो, कोर्टरूमचा सीन असेल तर एक गोष्ट कॉमन होती. ती म्हणजे साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला गीता किंवा कुराण कापडात गुंडाळून कोर्टाचा कर्माचारी शपथ घ्यायला सांगतो. मग, साक्षीदार त्यावर हात ठेवून शपथ घेतो की, ‘मी जे काही बोलेन ते मी सत्य सांगेन, सत्याशिवाय काहीही सांगणार नाही.’ न्यायालयांचे हे सिनेमॅटिक चित्र पूर्णपणे काल्पनिक नाही. ब्रिटिशांनी तो कायद्याचा भाग (oath act India) बनवला होता. इंग्रज गेल्यानंतरही धर्मग्रंथांवर हात ठेऊन साक्षीदारांना शपथ देण्याची परंपरा कोर्टात दीर्घकाळ चालू होती.