श्रीमद्भगवद्गीता हा हिंदू धर्मियांचा पवित्र ग्रंथ मानला जातो. धर्माच्या पलीकडे सुद्धा मानवता मानणाऱ्या अनेकांना गीतेचे श्लोक मार्गदर्शन करतात. भगवद्गीतेत तब्बल १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत ज्यातुन श्रीकृष्णाने अर्जुनासह पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला संदेश दिल्याचे मानले जाते. आत्मा, परमात्मा, भक्ती यांचा बोध देत कर्म व आयुष्यातील प्रत्येक टप्यावर येणाऱ्या अनेक द्विधा स्थितीत लढण्याचे बळ गीतेमध्ये दडलेले आहे. आपल्याच प्रियजनांविरुद्ध युद्ध लढण्यास जेव्हा अर्जुन संभ्रमित होता तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला गीतेचे ज्ञान दिले होते. त्यानंतर अर्जुनाने गांडीव उचलून युद्ध केले. हा प्रसंग आजही प्रत्येकजण कधी ना कधी आयुष्यात अनुभवतोच. प्रियजनच नव्हे तर कित्येकदा स्वतःचेच विचार, विश्वास, सवयी यांच्याविरुद्ध युद्ध करण्याची वेळ आपल्यावर येते, अशा स्थितीत काय केल्याने आपण आपले व आपल्या हितचिंतकांचे रक्षण करू शकता हे आज आपण गीतेच्या श्लोकातून समजून घेणार आहोत.
https://www.loksatta.com/astrology/bhagavad-gita-in-marathi-why-we-get-angry-all-the-time-these-minor-changes-while-working-making-love-or-money-astrology-svs-99-3846291/
